विवरे ता. रावेर – येथील निभोरा पोलिसांकडून विवरे गावात पथसंचलन करण्यात आले. नवरात्रोत्सव व आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बाजार चौकासह गावातील मुख्य मार्गाने संचलन केले.
या वेळी सह पोलिस निरीक्षक हरीदास बोचरे, पोलिस उपनिरीक्षक अभय ढाकणे, पो.का. अविनाश पाटील, रशिद तडवी, किरण जाधव, अमोल वाघ, सुरेश पवार, एस.आर.पी. चे जवान तसेच होमगार्ड यांसह पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





