रावेर – रावेर तालुक्यातील खिर्डी खुर्द येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस पंधरवड्यानिमित्त विद्यार्थ्यांना फळे व शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
हा उपक्रम विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष व भाजप तालुका उपाध्यक्ष (सावदा मंडळ) विलास पाटील यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी भाजप अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष जाबिर बेग, विद्या विकास मंडळाचे सदस्य हेमराज किरंगे, दत्तात्रय फालक, तसेच शाळेतील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.





