मुंबई – सध्या राज्यात सणासुदीचा काळ सुरू आहे. विशेषतः दिवाळी तोंडावर आल्यामुळे मुंबई आणि पुणे यांसारख्या मोठ्या शहरांत नोकरी आणि कामासाठी आलेले लाखो चाकरमानी आपल्या गावी जाण्याची तयारी करत आहेत. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अनेक कुटुंबे पर्यटनाचा देखील प्लॅन करतात. याच ऐन सणासुदीच्या काळात एसटी महामंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या या निर्णयामुळे आता एसटीने प्रवास करणे महागणार आहे. महामंडळाने तिकिट दरात वाढ केल्यामुळे, दरवर्षी दिवाळी साजरी करण्यासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या खिशाला याचा मोठा फटका बसणार आहे. तसेच सुट्टीमध्ये बाहेर फिरायला जाणाऱ्या कुटुंबांनाही आता जास्त खर्च करावा लागणार आहे. एसटी महामंडळाने घेतलेल्या या दरवाढीच्या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये थोडी नाराजी पसरली असून, दिवाळीचा प्रवास आता जास्त खर्चिक ठरणार आहे. सणासुदीच्या काळात गावी जाणाऱ्या लाखो प्रवाशांना एसटी महामंडळाने भाडेवाढीचा धक्का दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाने दिवाळीच्या निमित्ताने तिकीट दरात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा दरवाढीचा निर्णय एका विशिष्ट कालावधीसाठी लागू करण्यात आला आहे, ज्यामुळे प्रवाशांना या दिवसांमध्ये प्रवास करताना जास्त पैसे मोजावे लागतील.





