नाशिक – दसऱ्याला एक दिवस उरला असतानाच सोन्याच्या दरात मोठी उसळी नोंदवली गेली आहे. मंगळवारी २४ कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल ₹९२० रुपयांची वाढ झाली असून प्रति तोळा दर ₹१,०६,७०० वर स्थिरावला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचे दर ₹६८० रुपयांनी वाढून प्रति तोळा ₹९७,७००, आणि १८ कॅरेट सोन्याचे दर ₹५५२ रुपयांनी वाढून प्रति तोळा ₹६९,८४० झाले आहेत.
सोन्याबरोबरच चांदीच्या किमतींनीही नवा उच्चांक गाठला असून प्रति किलोग्रॅम दर ₹१,४२,५०० झाला आहे.
ग्राहकांची खरेदीची लगबग
सणासुदीचा हंगाम आणि लग्नसराई जवळ आल्याने ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात सोने खरेदी सुरू आहे. दर अजून वाढतील या भीतीमुळे अनेकांनी आधीच दागिने विकत घेण्यास सुरुवात केली असून चोख दागिन्यांना विशेष पसंती मिळत आहे.
दरवाढीमागची कारणे
सोन्याच्या दरवाढीमागे सणासुदीतील वाढती मागणी, आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी तसेच फेडरल रिझर्व्हच्या अलीकडील निर्णयांचा परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. स्पॉट गोल्डमध्ये १.१% वाढ होऊन ते प्रति औंस ₹३,६८३.२४ वर बंद झाले. या आठवड्यात सोन्याच्या दरात तब्बल ११% वाढ झाली आहे.





