जळगाव – दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी जळगाव येथे अब्दुल गफ्फार मालिक फाउंडेशनतर्फे स्व. डॉ. अब्दुल गफ्फार मालिक यांच्या पुण्यतिथीनिमित्त “ऑपरेशन सिंदूर समर्पित महारक्तदान शिबिर” आयोजित करण्यात आले. या शिबिरात तब्बल ४०२ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले.
या उपक्रमात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय रक्तपेढीचा सहभाग राहिला होता. रक्तसंकलनात दिलेल्या अनमोल सहकार्यासाठी एजाज भाई मालिक व नदीम भाई मालिक यांचा वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने गौरव करण्यात आला.
या गौरव समारंभात वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. गिरीश ठाकुर, विभाग प्रमुख डॉ. दीपक शेजवाल, इंचार्ज डॉ. कविता गीते पाटील तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते गौरवपत्र प्रदान करून मालिक फाउंडेशनचा सन्मान करण्यात आला.
सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत रक्तदानासारख्या महत्त्वपूर्ण कार्यात केलेल्या योगदानाबद्दल मालिक फाउंडेशनचे सर्वत्र कौतुक होत आहे.





