यावल – दिनांक 03 ऑक्टोबर गुप्त माहितीच्या आधारे यावल वन विभागाच्या गस्ती पथकाने धडक कारवाई केली. मध्यरात्री 12.45 वाजता कोरपावली गावाजवळ दबा धरून बसलेल्या पथकाला दोन अज्ञात इसम मोटारसायकलवरून साग लाकूड नेताना आढळले. पथकाने पाठलाग केला असता आरोपींनी अंधाराचा फायदा घेत जागेवरच मोटारसायकली आणि लाकूड फेकून पलायन केले.
कारवाईत साग चौपाट 20 नग (एकूण 0.320 घ.मी.) किंमत ₹11,200 आणि दोन मोटारसायकली (₹20,000 प्रत्येकी) मिळून सुमारे ₹51,200 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा माल मुख्य विक्री केंद्र, यावल येथे जमा करण्यात आला असून, याप्रकरणी गुन्हा क्रमांक 11/2025 नोंदवला आहे. पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक यावल, विभागीय वन अधिकारी धुळे, सहाय्यक वनसंरक्षक यावल यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी व गस्ती पथकाने केली. या वेळी वनरक्षक इंदल बी. चव्हाण, पोलिस शिपाई एस.आर. तडवी, वाहनचालक योगीराज तेली व सचिन चव्हाण उपस्थित होते.




