यावल – यावल येथील कुंभार वाड्यातील संत गोरोबा कुंभार दुर्गोत्सव मंडळाने यंदाचा नवरात्र उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला. बाबूजीपुरा भागातील सहा वर्षांच्या बालकाच्या हत्याकांडामुळे संपूर्ण परिसर शोकमग्न होता. या दुःखात सहभागी होत मंडळाने घटस्थापना ते विसर्जनपर्यंत कोणताही डीजे वा वाद्य न वापरता साध्या पद्धतीने उत्सव पार पाडला.
दहा दिवसाच्या उत्सवात गरबा-दांडिया आयोजित न करता केवळ आरतीच्या वेळी देवीची पूजा-अर्चना व भजन करण्यात आले. विसर्जन मिरवणूकही नेहमीप्रमाणे मोठ्या उत्साहात न काढता साधेपणाने घेण्यात आली. मंडपाऐवजी दुर्गा मातेची मूर्ती मेन रोडवरील संदिशा मेडिकलपासून विसर्जनासाठी नेण्यात आली.
या प्रसंगी मृत बालकाचे आजोबा यासीन खान नथ्थे खान यांनी सांगितले की,
“मंडळाचे पदाधिकारी, अध्यक्ष तसेच संपूर्ण कुंभार बांधव आणि वाड्यातील भोई कुंभार समाज आमच्या शोकात सहभागी झाले. त्यांनी दाखवलेले मानवतेचे दर्शन आम्हाला सदैव स्मरणात राहील. आम्ही त्यांच्या ऋणी आहोत.




