जळगाव- आनंदी व समाधानी जीवन जगण्यासाठी मनःशांती हवी आणि मनःशांतीसाठी मानवी जीवनातील ताणतणावावर नियंत्रण मिळवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन रोटरी क्लब जळगाव आयोजित शोध मनःशांतीचा या संवाद सत्रास उपस्थित मान्यवरांनी केले. संवाद सत्रास जिल्हा पोलीस अधिक्षक डाॅ. महेश्वर रेड्डी, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, दैनिक देशदूतचे संपादक हेमंत अलोने, जळगाव जनता बॅंकेच्या ओंकारेश्वर शाखेच्या शाखाधिकारी स्वाती भावसार व हृदयरोग तज्ज्ञ डाॅ. मिलिंद वायकोळे यांचा सहभाग होता. क्लबचे अध्यक्ष गिरीश कुळकर्णी यांनी संचालन केले. पोलीस अधिक्षक डाॅ. रेड्डी यांनी मानवाची प्रगतीच त्याच्या तणावाचे कारण बनते आहे का ? अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. ताण हा जीवनाचा अविभाज्य घटक असून आपण त्यावर नियंत्रण मिळवले पाहिजे. ताण निर्माण करणाऱ्या घटकांची मी यादी करतो. त्यामुळे होणाऱ्या परिणामांचा विचार करतो. योग्य व्यायाम-खेळ याद्वारे कॅलरी जाळतो. तसेच स्वतःला भाग्यवान समजतो कि माझ्याकडे इतरांपेक्षा खुप काही आहे. अलिकडचे माझ्यासह अनेक पालक आपल्या पाल्याबाबत अतिसंवेदनशील आहेत. आम्हाला आमच्या शिक्षकांनी जीवनातील सर्व आव्हानांना सामोरे जाण्यास तयार केले असेही ते म्हणाले. देशदूतचे संपादक अलोने यांनी ताणाचे सकारात्मक व नकारात्मक प्रकार असून मर्यादीत स्वरुपाचा ताण मानवी जीवनात प्रगतीसाठी आवश्यक असतो असे म्हटले. ताणावर मात करण्यासाठी घरात पाळीव प्राणी उपकारक ठरतात व आवश्यकतेनुसार समुपदेशकाची मदत घेणे तणावमुक्तीसाठी लाभदायक ठरते असे सांगितले. उपजिल्हाधिकारी मोरे व शाखाधिकारी भावसार यांनी नोकरदार महिलांना घर व कार्यालय अशी तारेवरची कसरत ठरते. मात्र आपला जोडीदार व एकत्र कुटुंबाचा खुप फायदा होतो असे म्हटले. मेडिटेशन व टिव्हीवरील अध्यात्मिक प्रवचने मनःशांतीसाठी दिशादर्शक ठरतात असे सांगितले. डाॅ. वायकोळे यांनी वैद्यकीय व्यवसाय हा अकल्पित व अनाकलनीय घटनांनी अधिक त्रस्त असतो. आवश्यक ज्ञान व कौशल्य कामास येते. कायम आनंदी रहाणं, हलकं होण्यासाठी चांगला मित्र असणं व रोटरी सारख्या सामाजिक संस्थेत कार्यरत असणं मनःशांती देऊन जाते मात्र त्याची अनुभूती मिळाली तर जीवन सुखकर होते असे म्हटले. या प्रसंगी मानद सचिव सुभाष अमळनेरकर, संवाद सचिव पंकज व्यवहारे, माजी प्रांतपाल डाॅ. चंद्रशेखर सिकची, प्रेम कोगटा, डाॅ. जयंत जहागिरदार राजेश यावलकर यासह रोटरी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ya batmi madhe heding v sab heding kont





