जळगाव – इक़रा एज्युकेशन सोसायटी, जळगाव यांच्या वतीने इक़रा शाही़न उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, महरूण येथे “कुरआन आणि सायन्स” या विषयावर आधारित भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा के. के. मोतीवाला सेमिनार हॉल, इक़रा एच. जे. थीम कॉलेज, महरूण येथे संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात कुरआन पठणाने करण्यात आली. प्राचार्य काजी जमीरुद्दीन सईदुद्दीन यांनी या प्रदर्शनाचे उद्दिष्ट स्पष्ट करत विद्यार्थ्यांना विज्ञान आणि धर्मातील संबंध समजून घेण्याचे आवाहन केले.
डॉ. नाजनीन देशमुख (माजी विद्यार्थिनी, ज्युनियर सायंटिस्ट – अब्दुल मजीद सालार इक़रा उर्दू हायस्कूल, बोरनार) यांना इक़रा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने “निशान-ए-इक़रा पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले. सध्या त्या नाशिक येथील आर. वाय. के. कॉलेज ऑफ सायन्समध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
कार्यक्रमात इक़रा एज्युकेशन सोसायटीचे जनरल सेक्रेटरी अल्हाज एजाज मलिक, मस्जिद अक्सा महरूणचे इमाम मौलाना सलीक सलमान, तसेच व्हॉइस ऑफ मीडिया (उर्दू विभाग) चे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती मोहम्मद हारून नदवी यांनी “कुरआन आणि सायन्स” या विषयावर विचारमंथन केले.
उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. अब्दुल करीम सालार (अध्यक्ष, इक़रा एज्युकेशन सोसायटी) यांनी भूषविले.
प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांचे तीन गट करण्यात आले —
-
इयत्ता ५वी ते ७वी,
-
इयत्ता ८वी ते १०वी,
-
ज्युनिअर कॉलेज.
परीक्षक म्हणून आरिफ मोहम्मद खान, शेख नूर मोहम्मद, फारूक सिकंदर, जावेद सर, तनवीर खान आणि अश्तियाक अहमद यांनी काम पाहिले.
या प्रदर्शनात ७३ वर्किंग मॉडेल्स सादर करण्यात आले असून प्रेक्षकांची गर्दी संध्याकाळपर्यंत कायम होती.
🏆 निकाल पुढीलप्रमाणे:
इयत्ता ५वी–७वी गट:
प्रथम – Earthquake (P-13)
द्वितीय – Blood Circulation (P-10)
तृतीय – Respiratory System (P-6)
इयत्ता ८वी–१०वी गट:
प्रथम – Embryology (H-8)
द्वितीय – DNA Structure (H-7) व Creation of the World in 6 Days (H-24)
तृतीय – Waqeyat (H-23)
ज्युनिअर कॉलेज गट:
प्रथम – Unveiling the Science Behind (J-26)
द्वितीय – Trigono Park (J-01)
तृतीय – Application of Solar Energy (J-9)
उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इफ्तेखार गुलाम रसूल यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुपरवायझर जाकीर बशीर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सायन्स शिक्षक, इतर शिक्षकवर्ग व नॉन-टीचिंग स्टाफ यांनी परिश्रम घेतले.
या यशस्वी उपक्रमाबद्दल इक़रा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार व पदाधिकाऱ्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमास प्रा. मोहम्मद जफर शेख, अब्दुर रशीद शेख, डॉ. जबीहुल्ला शाह, इरफान सालार, हाजी मजीद शाह, वसीम जबीहुल्ला शाह, अफजल खान, मुश्ताक बादलीवाला, शाहिद वहीद पटेल, अल्हाज अब्दुल हमीद, हाजी सैफुल्ला खान आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रदर्शनाच्या यशात हायस्कूल इंचार्ज काशिफ अंजुम अतहरुद्दीन आणि ज्युनिअर कॉलेज इंचार्ज तनझीम मुजफ्फर खान यांनी विशेष योगदान दिले.





