विवरे (ता. रावेर) – रावेर तालुक्यातील विवरे बु. येथे श्री संत सावता माळी नवदुर्गा उत्सवाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन शेगाव येथील भजनी मंडळ, विवरे येथील श्री संत सावता माळी महिला भजनी मंडळ तसेच गावातील लहान मुलींनी मिळून केले होते.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी गावातील देवीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. भजन, गाणी, नृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी वातावरण भक्तीमय झाले होते.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कु. कृष्णाली सणंसे, कु. देव्यानी सपकाळ, कु. तेजल सणंसे, कु. उन्नती हरणकार, कु. विनिता जुनघरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या प्रसंगी कृष्णल इरिगेशनचे संचालक श्री. दीपक सपकाळ, श्री. महेंद्र खुर्दे, श्री. महेश खुर्दे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर श्री. योगेश महाजन, श्री. दीपक महाजन, श्री. टिकाराम जुनघरे, श्री. विलास महाजन, श्री. दिलीप सपकाळ, श्री. संजय पुणतकर, भानुदास महाजन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
श्री संत सावता माळी नवदुर्गा मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रमोद सणंसे, उपाध्यक्ष श्री. दिनेश महाजन (पिंटू माळी), तसेच हर्षल वाघ, आकाश काठोळे, किरण सपकाळ, वासुदेव इंगळे, स्वप्नील सपकाळ, गोपाळ जुनघरे, निलेश जुनघरे, गौरव सपकाळ, ललित सपकाळ, ग्रा. पं. सदस्य वासुदेव नरवाडे, निखिल मारूळकर, राहुल सावळकर, हितेश जुनघरे, ईश्वर इंगळे, चेतन सपकाळ, देवेंद्र सपकाळ, गणेश खुर्दे, मोहित सणंसे, मोहन सावळकर, यश खुर्दे, नितीन धानोळे, भूषण सावळकर, गणेश डोंगरे, दीपक सणंसे, हर्षल सपकाळ, जीवन वाघ, यश सणंसे, महेंद्र सावळकर, लक्ष्मण सावळकर, सनी खुर्दे, यागेश सपकाळ, निखिल सावळकर, सागर खुर्दे आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमात गावातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
भक्तीभाव, एकता आणि संस्कृतीचा संगम घडविणारा हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.





