पहुर (ता. जामनेर) – पहुर शहरातील ख्वाजा नगर भागातील वार्ड क्र. ६ मध्ये मशीदीजवळ असलेली डीपीची फ्यूज पेटी बिघडल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या भागातील वायरमन वेळेवर येत नसल्यामुळे नागरिकांना स्वतःहून फ्यूज टाकण्याची वेळ येते. परिणामी वारंवार विद्युत तारा बिघडत असून, परिसरात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत.
महावितरण विभागाकडून या भागात सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, “महावितरणने लवकरात लवकर नवीन फ्यूज पेटी बसवावी, जेणेकरून होणारा त्रास कमी होईल.”





