मुंबई – भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) यांनी १ ऑक्टोबर २०२५ पासून आधार नोंदणी व अद्ययावतीकरण सेवांच्या शुल्कात मोठी वाढ केली आहे. या वाढीमुळे काही सेवांचे शुल्क तब्बल ५० टक्क्यांपर्यंत वाढले असून, सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे.
ही सुधारित शुल्कयादी ३० सप्टेंबर २०२८ पर्यंत लागू राहणार आहे. देशातील प्रत्येक रहिवाशासाठी आधार कार्ड अनिवार्य असल्याने या वाढीचा परिणाम सर्वच स्तरांवर जाणवणार आहे.
नवीन नोंदणी आणि ५ ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या बायोमेट्रिक अद्ययावतीकरण सेवांना मात्र शुल्कातून सवलत देण्यात आली आहे. परंतु इतर सेवांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
वाढलेली शुल्के पुढीलप्रमाणे :
-
बायोमेट्रिक अद्ययावतीकरण: ₹100 → ₹125
-
डेमोग्राफिक अद्ययावतीकरण: ₹50 → ₹75
-
दस्तऐवज अद्ययावतीकरण: ₹50 → ₹75
-
ई-केवायसी, आधार शोध, रंगीत प्रिंट: ₹30 → ₹40
या निर्णयामुळे विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, वाढीव शुल्कामुळे अतिरिक्त आर्थिक भार पडला आहे.





