जळगाव – जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव शहर महानगरपालिका आणि जिल्हा हौशी कॅरम संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने, जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या विशेष सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे मनपा स्तरीय आंतरशालेय कॅरम स्पर्धा १ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडल्या.
या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलं आणि मुलींच्या गटात रोमांचक सामने रंगले. यामध्ये इकरा शाहीन उर्दू हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करून विभागीय स्तरासाठी पात्रता मिळवली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थिनींत
१) जुनेरा इमरान खाटीक (इयत्ता चौथी)
२) आयशा सिद्दिका शेख रोशन (इयत्ता पाचवी)
यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, मागील वर्षी देखील या दोन्ही विद्यार्थिनींनी नाशिक विभागीय स्पर्धेत इकरा शाहीन हायस्कूलचे प्रतिनिधित्व केले होते. यंदाही त्या १७ ऑक्टोबर २०२५ रोजी नाशिक येथे विभागीय स्तरावर आपले कौशल्य सादर करणार आहेत.
या यशाबद्दल इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार, चेअरमन डॉ. मोहम्मद ताहेर शेख, इरफान सालार, मुख्याध्यापक काझी जमीरुद्दीन, शेख जाकीर बशीर व क्रीडा शिक्षकांनी दोन्ही विद्यार्थिनींचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





