नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय श्री भूषण गवई यांच्यावर आज एका व्यक्तीने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय असल्याचे मत सामाजिक समरसता मंचतर्फे व्यक्त करण्यात आले आहे.
संस्थेच्या निवेदनात म्हटले आहे की, देशाच्या सर्वोच्च न्यायसंस्थेच्या प्रमुखांवर हल्ल्याचा प्रयत्न हा केवळ एका व्यक्तीवरचा आघात नसून, भारतीय न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेवर झालेला गंभीर प्रहार आहे. न्यायसंस्थेवरील जनतेचा विश्वास अबाधित राहावा यासाठी अशा प्रवृत्तीला कायद्याने कठोर शिक्षा मिळणे आवश्यक असल्याचे मतही मंचाने व्यक्त केले आहे.
सामाजिक समरसता मंचने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवित, संबंधित यंत्रणांनी तातडीने कठोर कारवाई करून न्यायसंस्थेच्या गौरवाचे रक्षण करावे, अशी मागणी केली आहे.





