जळगाव – राज्य शासनाने आज पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून त्यामध्ये जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नाशिक येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी रोहन घुगे हे जळगावचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झाले आहेत.
याबाबतचे अधिकृत आदेश राज्य शासनाने आज निर्गमित केले. आयुष प्रसाद यांनी गेल्या काही काळात जळगाव जिल्ह्यात विविध विकासकामांवर लक्ष केंद्रित केले होते. आता ते नाशिक जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारतील.
नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झालेले रोहन घुगे यापूर्वी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. येत्या काही दिवसांत ते जळगाव येथे पदभार स्वीकारणार आहेत.
या बदल्यांमुळे जिल्हा प्रशासनात नवीन नेतृत्वासह कार्यपद्धतीत बदल अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे.





