यावल – अंजुमन-ए-इस्लाम उर्दू हायस्कूल अँड जुनिअर कॉलेज, साकळी येथे दिनांक ५ ऑक्टोबर रोजी माजी विद्यार्थ्यांचा भव्य गेट-टुगेदर कार्यक्रम उत्साहात पार पडला. सन १९८६-८७ ते १९९७-९८ दरम्यान शाळेत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थी, शिक्षकवृंद आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात आसिफ खान साहेब खान यांच्या कुराण पठणाने झाली. अध्यक्षस्थानी हाजी सत्तार खान अय्यूब खान (संस्था अध्यक्ष) होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये इस्माईल खान इसे खान (उपाध्यक्ष), निसार खान (चेअरमन), बशीर खान, शौकत खान, अशरफ खान, कलिमुद्दीन गुलामुद्दीन (जळगाव) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
माजी विद्यार्थी आणि शिक्षकवर्गांमध्ये शेख जाविद, शेख तसलीम, शेख इक्बाल, मुजाहिद खान, आसिफ खान, सुनूस तडवी, अजमल खान, रऊफ शेख, इक्बाल शेख आदींचा समावेश होता.
माजी शिक्षक व कर्मचारी वर्गातून हनीफ सर, इरफान सर, अमान सर, असलम सर, फरजाना मॅडम, आबेदा मॅडम (भुसावळ) आदी उपस्थित होते.
या वेळी हाजी सत्तार खान यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख जाविद शेख याकूब यांनी केले, तर आभारप्रदर्शन तसलीम शेख रज्जाक यांनी केले.
या गेट-टुगेदरमुळे जुन्या आठवणींना नवी उभारी मिळाली असून माजी विद्यार्थ्यांमध्ये एकोपा, सलोखा आणि बंधुभावाचे वातावरण निर्माण झाले.





