रावेर – मध्यप्रदेश सीमेलगत असलेल्या रावेर शहरात आद्यकवी व रामायण ग्रंथाचे रचयिता महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात समाजबांधव आणि मान्यवरांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमास प्रारंभ झाला.
उत्सव समितीचे अध्यक्ष हरलालभाऊ कोळी यांनी प्रास्ताविकातून कोळी समाजाच्या विविध अडचणी मांडल्या. विशेषतः जात प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे आणि त्याची पडताळणी सुद्धा सुलभ पद्धतीने व्हावी, अशी मागणी त्यांनी शासन व लोकप्रतिनिधींना केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आत्मारामभाऊ कोळी होते. तसेच माजी आमदार अरुणदादा पाटील, आमदार अमोलभाऊ जावळे, अशोकभाऊ कांडेलकर यांनी मनोगत व्यक्त करून समाजाच्या एकतेचे महत्त्व अधोरेखित केले.
यानंतर छोरिया मार्केटपासून जयंती मिरवणुकीला प्रारंभ झाला. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांनी वातावरण भारले गेले. मिरवणुकीचा समारोप रावेर पंचायत समिती येथे करण्यात आला.
या वेळी आमदार अमोल जावळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील, प्रभाकर आप्पा सोनवणे, प्रल्हाद पाटील, नंदुभाऊ महाजन, हरलाल कोळी, संतोष सपकाळे आप्पा, सुनिल कोळी, सुरेश धनके, पद्माकर महाजन, सोपान पाटील, राजुभाऊ सर्वणे, योगेश्वर कोळी, ईश्वर तायडे, बंडुभाऊ कोळी, शिवा भाईजी, चंदकांत कोळी, राजन लासुरकर, उमेश गाढे, रविंद्र रायपुरे, गोपाळ सपकाळे, सदाशिव कोळी, भूषण तायडे, दुर्गादास पाटील, मनोहर कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपकाळे सर यांनी केले, तर आभारप्रदर्शन सपकाळे आप्पा यांनी केले.





