पहुर – मौजे सांगवी येथे दिनांक २ ऑक्टोबर २०२५ रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली. या ग्रामसभेत “धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान” व “आदी कर्मयोगी अभियान” अंतर्गत सांगवी गावाचा कृती आराखडा तयार करून त्यास मंजुरी देण्यात आली.
ग्रामसभेचे अध्यक्षस्थान चांदखा भिकन तडवी यांनी भूषवले. या सभेला लोकनियुक्त सरपंच अफजल तडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे, लोकनेते, ग्रामपंचायत अधिकारी योगेश पालवे, उपसरपंच शरद पांढरे, महेश अशोक पाटिल, शेंदुर्णी जिनिंगचे संचालक श्याम सावळे, प्रॉपर सदस्य शेख चांद, जलालुद्दीन तडवी, ईश्वर बारी तसेच इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेत गाव विकास आराखड्यावरील सविस्तर चर्चा करण्यात आली असून, ग्रामस्थांच्या एकमताने हा आराखडा मंजूर करण्यात आला.





