नवी दिल्ली :
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची अंतिम सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात होणार होती. मात्र ही सुनावणी आता एक महिना पुढे ढकलण्यात आली असून, पुढील सुनावणी १२ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर हा खटला सुनावणीसाठी निश्चित होता. परंतु सशस्त्र दलासंबंधी असलेल्या महत्त्वाच्या प्रकरणामुळे त्यांना या खटल्यासाठी वेळ देता आला नाही.
सुनावणीदरम्यान उद्धव ठाकरे यांच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा हवाला देत लवकरात लवकर तारीख देण्याची मागणी करण्यात आली, तर एकनाथ शिंदे यांच्या वकिलांनी डिसेंबरमधील तारीख देण्याची विनंती केली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने १२ नोव्हेंबर ही पुढील सुनावणीची तारीख निश्चित केली.





