यावल – येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल आणि आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्यात 2024 ते 2026 या तीन वर्षांच्या कालावधीसाठी सामंजस्य करार झाला आहे. या कराराअंतर्गत दरवर्षी प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
यावर्षी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व योजनांविषयी माहिती देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पी. व्ही. पावरा तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. मृणाल धायडे उपस्थित होते.
प्रमुख वक्ते प्रा. मृणाल धायडे यांनी आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सरकारच्या विविध शिष्यवृत्ती योजनांविषयी माहिती दिली. यात भारत सरकार शिष्यवृत्ती योजना, महाराष्ट्र सरकार शिष्यवृत्ती योजना, तसेच आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात शिकत असताना या योजनांचा लाभ घेण्यास प्रोत्साहन दिले.
अध्यक्ष डॉ. पी. व्ही. पावरा यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आणि आपल्या समाजापर्यंत माहिती पोहोचवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सी. टी. वसावे यांनी केले, तर आभार प्रा. नागेश्वर जगताप यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.





