पहुर – पहुर शहरात मदरसा मदिनतुल उलूम या नवीन मदरशाची स्थापना दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात आली. या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन मुफ्ती आरिफ साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून हाफिज अफजल खान उपस्थित होते. तसेच मौलाना मोईनुद्दीन, हाफिज जुबेर, सैय्यद जमील, मुन्ना पठाण, सलीम शेख, युनूस खान, सरदार भाई, साबीर मंसुरी, शाहबोद्दीन मौलाना, रईस मौलाना, सरफोद्दीन भाई, मुख्तार शाह, खलिल मिलन, फिरोज भाई, तौसीफ राज, शाकीर शेख, रहिम तडवी, शाहरुख तडवी, अशरफ खान, रईस टेलर, अशरफ टेलर, आफताब खान आदी मान्यवर उपस्थित होते.
मदरशाच्या स्थापनेनंतर उपस्थित पाहुण्यांनी धार्मिक शिक्षणाच्या प्रसाराचे महत्त्व आणि समाजातील युवकांनी शिक्षणासोबत नैतिक मूल्ये आत्मसात करण्याची गरज अधोरेखित केली.





