मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीत एकूण 938 पदे भरण्यात येणार असून इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्जाची सुरुवात: 7 ऑक्टोबर 2025 अर्जाची शेवटची तारीख: 27 ऑक्टोबर 2025
पदे व रिक्त जागा : उद्योग निरीक्षक – 9 पदे तांत्रिक सहाय्यक – 4 पदे कर सहाय्यक – 73 पदे लिपिक-टंकलेखक – 852 पदे
शैक्षणिक पात्रता : उद्योग निरीक्षक (गट-क) वगळता इतर पदांसाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने समतुल्य मान्य केलेली अर्हता असणे आवश्यक आहे.
तांत्रिक पदांसाठी विज्ञान शाखेतील पदवी किंवा अभियांत्रिकी/तंत्रज्ञानातील डिप्लोमा आवश्यक आहे.
टंकलेखनाची अट : मराठी टंकलेखन: 30 शब्द प्रति मिनिट इंग्रजी टंकलेखन: 40 शब्द प्रति मिनिट उमेदवारांनी या दोन्ही अर्हता शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा किंवा शासनमान्य समकक्ष प्रमाणपत्राद्वारे पूर्ण केलेली असावी.
इतर अट : मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. अर्ज प्रक्रिया केवळ ऑनलाइन.





