मुंबई – आजवर पोस्टमन घराच्या दारात येऊन पत्र, टपाल व मनिऑर्डर देत असे. मात्र आता तो केवळ टपाल देणार नाही, तर तुमच्याकडील पत्रे आणि पार्सलदेखील घराच्या दारातूनच घेऊन जाणार आहे. पोस्ट विभागाची ही नवी सेवा काही निवडक शहरांत सुरू झाली असून लवकरच देशभर विस्तारली जाणार आहे.
दिल्ली, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थानातील जोधपूर, तेलंगणातील हैदराबाद आणि उत्तर प्रदेशातील प्रतापगड या शहरांमध्ये या सेवेची सुरुवात झाली आहे.
एखादी वस्तू ५०० रुपयांपर्यंत असेल तर पोस्टमन फक्त ५० रुपये सेवा शुल्क घेईल. त्यापेक्षा जास्त किमतीच्या वस्तूसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
पोस्ट विभागाच्या या नव्या निर्णयामुळे खासगी कुरिअर कंपन्यांना थेट स्पर्धा निर्माण झाली आहे. विभाग नव्या ॲडव्हान्स्ड पोस्टल तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना अधिक सोयीस्कर सेवा देण्याच्या तयारीत आहे.





