फतेपुर – फतेपुर येथील उर्दू जिल्हा परिषद शाळेत स्थापन समितीच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना सफरचंद वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास स्थापन समितीचे अध्यक्ष अलीम कुरेशी, तसेच आसिफ शेख, नविद शाह, आरिफ शेख, वसीम शाह, अली सय्यद, इम्रान पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक साबीर सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या वेळी इम्रान सर, जुबेर सर, इस्माईल सर आणि इतर शिक्षकवर्ग उपस्थित होता.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.





