काबुल – परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर असताना पाकिस्तानने अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अफगाण सैन्याने पाकिस्तानविरोधात मोठी लष्करी कारवाई केली असून, 58 पाकिस्तानी सैनिक ठार आणि 30 जखमी झाल्याची माहिती अफगाणिस्तानकडून देण्यात आली आहे.
या कारवाईत पाकिस्तानच्या 25 चौक्या आणि आसपासचा परिसर अफगाणिस्तानच्या ताब्यात गेल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानकडून मात्र या आकडेवारीवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
अफगाणिस्तानचे प्रवक्ते जबिहुल्लाह मुजाहिद यांनी सांगितले की, या कारवाईत पाकिस्तानचा मोठा शस्त्रसाठा आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. अफगाणिस्तानचे 20 सैनिक या संघर्षात शहीद झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“ही कारवाई पूर्णपणे थांबवणे शक्य नाही, पाकिस्तानच्या हल्ल्याचा पूर्ण बदला घेतला जाईल,”असे अफगाणिस्तानने स्पष्ट केले आहे.





