मुंबई – वांद्रे (पश्चिम), मुंबई येथील लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. रुग्णालयात पूर्णवेळ सोनोलॉजिस्ट तसेच कार्डिओलॉजी विभागातील निवासी पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज १६ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सादर करावेत. अर्ज ऑफलाइन किंवा ई-मेलद्वारे ऑनलाइन या दोन्ही मार्गांनी पाठविता येतील. अर्ज मानव संसाधन विभाग, लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, वांद्रे (पश्चिम), मुंबई – ४०००५० या पत्त्यावर पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अर्ज सादर करताना सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावीत आणि कोणत्याही प्रकारच्या त्रुटी टाळाव्यात, अशी सूचना रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.





