मुंबई – राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) सुमारे ८५ हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून ६ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे.
तसेच, कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा फरक देण्यासाठी दरमहा ६५ कोटी रुपये महामंडळाला दिले जाणार असून, पात्र कर्मचाऱ्यांना १२,५०० रुपये दिवाळी अग्रीम म्हणून देण्यात येणार आहेत.
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी त्यांनी सांगितले की,
“राज्यात अतिवृष्टीमुळे परिस्थिती कठीण असली तरी एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे.”
तसेच, शिंदे यांनी सांगितले की एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हे सरकारचे पुढील उद्दिष्ट आहे.





