भुसावळ – अनेक वर्षांपासून भुसावळ, खंडवा, बुरहानपूर, रावेर, सावदा मार्गे कल्याण आणि पुणेपर्यंत हुतात्मा एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी होत होती. परंतु रेल्वे प्रशासनाने ही गाडी थेट अमरावतीहून सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
भारतीय किसान संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व प्रवासी संघटनेचे नेते प्रशांत बोरकर यांनी सांगितले की,
“गाडी अमरावतीहून सुटल्यामुळे ती आधीच भरलेली येईल, त्यामुळे भुसावळ-जळगाव विभागातील प्रवाशांना जागा मिळणे कठीण होईल.”
त्यांनी पुढे आरोप केला की, “आपल्या जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी खाजगीकरणाला प्रोत्साहन देत आहेत, ज्यामुळे स्थानिक प्रवाशांचे हाल होत आहेत.”





