विवरा (ता. रावेर) – निंभोरा बु. (ता. रावेर) येथील जिल्हा परिषद शाळेत संविधान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अनुमोदर्शी तायडे सर यांनी विद्यार्थ्यांना संविधानाबाबत मार्गदर्शन केले.
तायडे सर यांनी भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्ये, नागरिकांच्या जबाबदाऱ्या, संविधान निर्मितीचा इतिहास, संविधानाचे महत्त्व आणि महिलांना दिलेले अधिकार या विषयांवर सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संविधान उद्देशिकेचे वाचन व संविधान पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. एस. डी. चौधरी, संविधान प्रचारक हर्षल कुऱ्हे, नितेश पोहेकर, उत्पल तायडे, व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गौतम कुऱ्हे, उर्दू शाळेचे शिक्षक मो. इकबाल सर, दस्तगीर खाटीक, शिक्षणतज्ज्ञ अक्षय तायडे, मुख्याध्यापक विकास सुरेंद्र जनबंधू, उपशिक्षक सोमनाथ उघाडे यांच्यासह शालेय विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन संविधान प्रचारक प्रफुल कुऱ्हे यांनी केले. त्यांनी भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन करून कार्यक्रमाची सांगता केली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संविधान जागर अभियान संयोजन समितीने विशेष प्रयत्न केले.





