फत्तेपूर (ता. जामनेर) –
जिल्हा परिषद उर्दू शाळा, फत्तेपूर येथे मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त व वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमास जामनेर उर्दू केंद्राचे केंद्रप्रमुख मो. विकार साहेब, शाळेचे मुख्याध्यापक साबीर खान, माजी पदवीधर शिक्षक इस्माईलोद्दीन पीरझादे, माजी जेष्ठ शिक्षक अब्दुल वाहिद सर, पदवीधर शिक्षक इमरान हाजी, इमरान खान, महिला शिक्षिका श्रीमती यास्मीन बाजी, तसेच मो. नासीर सर, आदिल सर, शादाब सर, अंशकालीन शिक्षक सय्यद इस्माईल, मो. जुबेर सर आणि सलमान सर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इमरान हाजी यांनी केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी माहिती देण्यात आली.
यावेळी शाळेतून बदली झालेले शिक्षक इस्माईलोद्दीन मिस्बाहोद्दीन पीरझादे आणि मो. वाहिद सर यांचा निरोप समारंभही छोटेखानी पद्धतीने घेण्यात आला.





