जळगाव –
जळगाव तालुक्यातील रायपूर गावाजवळ दोन दुचाकींचा समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारास ९.३० वाजता घडली असून, या प्रकरणी मंगळवारी (१४ ऑक्टोबर) एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत तरुणाचे नाव सुनिल भिका बनसोडे (वय ३८, रा. रायपूर कुसुंबा, ता. जळगाव) असे आहे. ते मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. अपघाताच्या वेळी ते सुप्रिम कॉलनीहून दुचाकीने रायपूरकडे जात असताना, समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.
या धडकेत सुनिल बनसोडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर मृताची पत्नी रूपाली बनसोडे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी दुसऱ्या दुचाकीस्वार विलास सुधाकर कोळी (रा. कुसुंबा, ता. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोहेकॉ चंद्रकांत पाटील करीत आहेत.





