• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 3, 2026
Dainik Vyaghra Shuryam Live News
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
Dainik Vyaghra Shuryam Live News
No Result
View All Result

स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांची दमदार कारवाई

मुक्ताईनगर आणि वरणगाव येथील पेट्रोलपंप दरोडा प्रकरणाचा उलगडा; ५ आरोपींना अटक

vyaghra shuryam by vyaghra shuryam
October 16, 2025
in ताज्या बातम्या, खान्देश, जळगाव
0
स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांची दमदार कारवाई
बातमी शेअर करा !

रावेर तालुका –जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर व वरणगाव परिसरात झालेल्या सशस्त्र दरोड्याचा थरार उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठे यश मिळवले आहे. ९ सप्टेंबर रोजी रात्री १० ते ११ वाजेच्या सुमारास तीन पेट्रोल पंपांवर झालेल्या या दरोड्यात आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवत तब्बल ₹१,३३,५०० किंमतीचा मुद्देमाल लुटला होता.

दरोड्याची पार्श्वभूमी मुक्ताईनगर येथील बोदवड चौफुलीवरील रक्षा टोफ्युअल (भारत पेट्रोलियम), कर्की फाटा येथील मनुभाई अशिर्वाद पेट्रोल पंप आणि वरणगाव शिवारातील तळवेल फाटा येथील सय्यद पेट्रोल पंप येथे पाच ते सहा अनोळखी आरोपी मोटारसायकलवर येऊन बंदुकीच्या धाकाने दरोडा टाकून रोख रक्कम, मोबाईल व सीसीटीव्ही डीव्हीआर घेऊन फरार झाले होते.

या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ३१६/२०२५, कलम ३९७ भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांची चौकशी आणि तपास मोहीम या गंभीर घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्काळ तपासाचे आदेश दिले.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी पाच स्वतंत्र तपास पथके तयार केली. या पथकांनी नाशिकपासून अकोल्यापर्यंत शोधमोहीम राबवली. अखेर चौघा आरोपींना नाशिक येथून आणि एक आरोपी व एका विधी संघर्षित बालकास अकोल्यातून अटक करण्यात आली.

अटक आरोपी आणि पार्श्वभूमी अटक आरोपींपैकी सचिन अरविंद भालेराव (वय ३५, रा. भुसावळ, ह.मु. खकनार, जि. बुरहानपूर, मध्यप्रदेश) याच्यावर यापूर्वीही खुनाचा प्रयत्न आणि दंगा अशा स्वरूपाचे दोन गुन्हे नोंद आहेत. त्यास २०२३ मध्ये महापालिका कायदा कलम ५५ अंतर्गत दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते.

पोलिस दलाची उल्लेखनीय भूमिका या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. शरद बागल, रवी नरवाडे, सोपान गोरे, जितेंद्र वल्टे, तसेच पोलीस अंमलदार आणि कर्मचारी यांच्या पथकाने सलग चार दिवस मेहनत घेतली.

या यशस्वी कारवाईचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी विशेष कौतुक केले असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या या जलद आणि काटेकोर तपासाची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

बातमी शेअर करा !
Next Post
जरंडी येथे दुहेरी चोरीची घटना; दोन दुकानांचे कुलूप फोडून रोकड व मोबाईल लंपास

जरंडी येथे दुहेरी चोरीची घटना; दोन दुकानांचे कुलूप फोडून रोकड व मोबाईल लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निमखेडी शिवारात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; परिसरात खळबळ

निमखेडी शिवारात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; परिसरात खळबळ

December 16, 2025
उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु कालेज मध्ये रेबीज आणि ॲनिमिया जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु कालेज मध्ये रेबीज आणि ॲनिमिया जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

December 16, 2025
आईला शिवीगाळ व मारहाणीचा जाब विचारल्याने युवकावर चाकू हल्ला

आईला शिवीगाळ व मारहाणीचा जाब विचारल्याने युवकावर चाकू हल्ला

December 16, 2025
पाल येथे नामदार नूरखा तडवी उर्दू हायस्कूलमध्ये तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

पाल येथे नामदार नूरखा तडवी उर्दू हायस्कूलमध्ये तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

December 16, 2025
Load More
Dainik Vyaghra Shuryam Live News

© 2025 Vyaghra Shuryam Live News

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक

© 2025 Vyaghra Shuryam Live News