जरंडी –15 ऑक्टोबर 2025 सोयगाव तालुक्यातील जरंडी गावात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दोन दुकानांचे कुलूप तोडून रोकड व मोबाईल असा मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारास साडेतीन वाजता ‘राजे मोबाईल शॉपी’ व ‘ओम पशु आहार’ या दोन दुकानांचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी फोडले. या चोरीत चोरट्यांनी अंदाजे ₹६०,००० ते ₹७०,००० इतकी रोकड व ८ मोबाईल घेऊन पोबारा केला.
सदरील दोन्ही दुकाने ग्रामपंचायतीच्या शेजारीच असतानाही, ग्रामपंचायतीने बसवलेले CCTV कॅमेरे बंद असल्याने तपास अधिक गुंतागुंतीचा झाला आहे.
या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. पुढील तपास सुरू आहे.





