• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 3, 2026
Dainik Vyaghra Shuryam Live News
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
Dainik Vyaghra Shuryam Live News
No Result
View All Result

साकळीमध्ये ‘ग्रामस्वच्छता अभियान’ला जोरदार प्रतिसाद; सरपंच दीपक पाटील यांचा पुढाकार

vyaghra shuryam by vyaghra shuryam
October 17, 2025
in ताज्या बातम्या, खान्देश
0
साकळीमध्ये ‘ग्रामस्वच्छता अभियान’ला जोरदार प्रतिसाद; सरपंच दीपक पाटील यांचा पुढाकार
बातमी शेअर करा !

साकळी (ता. यावल) – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान–२०२५ अंतर्गत साकळी ग्रामपंचायतीकडून ‘स्वच्छ ग्राम, सुंदर ग्राम’ हा संकल्प हाती घेण्यात आला आहे. या मोहिमेत दररोज किमान एक ग्रामविकासाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, विशेष भर गावातील स्वच्छतेवर देण्यात आला आहे.

ग्रामस्थ उघड्यावर कचरा टाकू नयेत म्हणून सरपंच दिपक नागो पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. नागरिकांना स्वच्छतेबाबत जागरूक करण्यासाठी सरपंच स्वतःही सफाई मोहिमेत झाडू आणि फाकडा हाती घेऊन सहभागी झाले. त्यांच्या या कृतीकडे ग्रामस्थांनी लक्ष देत कौतुकाचा वर्षाव केला.

“ग्रामस्वच्छतेतच गावाची खरी सुंदरता आहे” — या ध्येयातून ग्रामपंचायत, सफाई कर्मचारी, सदस्य, अधिकारी पी. आर. धनगर तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गावातील सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर आणि बाजारपेठेत टप्प्याटप्प्याने स्वच्छता करण्यात आली.

दर सोमवारी ‘स्वच्छता वार’ म्हणून साजरा करण्याचे नियोजन ग्रामपंचायतीने केले असून, उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर रु.१५०० दंड आकारला जाणार आहे. तसेच प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, यामुळे स्वच्छतेबाबत ग्रामस्थांचा सहभाग अधिक वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा !
Next Post
रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना सुवर्णसंधी — प्रमाणित हरभरा व ज्वारी बियाणे अनुदान दरात उपलब्ध

रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना सुवर्णसंधी — प्रमाणित हरभरा व ज्वारी बियाणे अनुदान दरात उपलब्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निमखेडी शिवारात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; परिसरात खळबळ

निमखेडी शिवारात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; परिसरात खळबळ

December 16, 2025
उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु कालेज मध्ये रेबीज आणि ॲनिमिया जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु कालेज मध्ये रेबीज आणि ॲनिमिया जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

December 16, 2025
आईला शिवीगाळ व मारहाणीचा जाब विचारल्याने युवकावर चाकू हल्ला

आईला शिवीगाळ व मारहाणीचा जाब विचारल्याने युवकावर चाकू हल्ला

December 16, 2025
पाल येथे नामदार नूरखा तडवी उर्दू हायस्कूलमध्ये तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

पाल येथे नामदार नूरखा तडवी उर्दू हायस्कूलमध्ये तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

December 16, 2025
Load More
Dainik Vyaghra Shuryam Live News

© 2025 Vyaghra Shuryam Live News

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक

© 2025 Vyaghra Shuryam Live News