• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 3, 2026
Dainik Vyaghra Shuryam Live News
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
Dainik Vyaghra Shuryam Live News
No Result
View All Result

विवरा–खिर्डी रस्त्यांची दुरवस्था; प्रवाशांचा संताप

खड्ड्यांनी व्यापलेला मार्ग, वाहनचालकांची तारेवरची कसरत

vyaghra shuryam by vyaghra shuryam
October 18, 2025
in जळगाव, खान्देश, ताज्या बातम्या
0
विवरा–खिर्डी रस्त्यांची दुरवस्था; प्रवाशांचा संताप
बातमी शेअर करा !

विवरा (ता. रावेर) – विवरा ते खिर्डी या सुमारे ४ किलोमीटर अंतरावरील मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, प्रवासी आणि वाहनचालकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. काही महिन्यांपूर्वीच या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती; मात्र पहिल्याच पावसात संपूर्ण रस्ता वाहून गेला आहे.

रस्त्यावर मोठे खड्डे, फुटलेले डांबर आणि साईड पट्ट्यांचा पूर्ण अभाव असल्याने वाहनचालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. या मार्गावरून दररोज केळीने भरलेले ट्रक, ट्रॅक्टर आणि दुचाकी वाहनं मोठ्या प्रमाणावर धावत असतात. त्यामुळे अपघाताची शक्यता कायम निर्माण होते.

स्थानिक नागरिक सांगतात, “पावसाळ्यात तर परिस्थिती इतकी बिकट होते की पायी चालणेही कठीण होते. अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी या रस्त्याची दुरुस्ती तातडीने करावी, अन्यथा मोठ्या आंदोलनाचा इशारा आम्ही देऊ.”

या रस्त्यामुळे केवळ शेतकरीच नव्हे, तर विद्यार्थी आणि कामगारवर्गालाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी या समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन विवरा–खिर्डी रस्त्याचे पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे.

बातमी शेअर करा !
Next Post
निधान वार्ता – ऑड मुख्तार शेख

निधान वार्ता - ऑड मुख्तार शेख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निमखेडी शिवारात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; परिसरात खळबळ

निमखेडी शिवारात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; परिसरात खळबळ

December 16, 2025
उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु कालेज मध्ये रेबीज आणि ॲनिमिया जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु कालेज मध्ये रेबीज आणि ॲनिमिया जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

December 16, 2025
आईला शिवीगाळ व मारहाणीचा जाब विचारल्याने युवकावर चाकू हल्ला

आईला शिवीगाळ व मारहाणीचा जाब विचारल्याने युवकावर चाकू हल्ला

December 16, 2025
पाल येथे नामदार नूरखा तडवी उर्दू हायस्कूलमध्ये तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

पाल येथे नामदार नूरखा तडवी उर्दू हायस्कूलमध्ये तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

December 16, 2025
Load More
Dainik Vyaghra Shuryam Live News

© 2025 Vyaghra Shuryam Live News

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक

© 2025 Vyaghra Shuryam Live News