ऐनपूर ता रावेर – विवरा-निंभोरा जिल्हा परिषद गट यंदा अनुसूचित जाती (महिला राखीव) प्रवर्गासाठी आरक्षित असून या गटातून सौ.लीला प्रकाश तायडे इच्छुक असून त्यांची दावेदारी चर्चेत आहे.
सौ.लीला प्रकाश तायडे या पदव्यूत्तर पदवी उच्चशिक्षित महिला असून त्यांचे कुटुंब वारकरी सांप्रदायातील आहे.
जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट तसेच गणातील आरक्षण नुकतेच जाहीर झालेले असून आरक्षणाच्या बाबतीत कही ख़ुशी कही गम अशी अवस्था पाहवयास मिळत आहे. निवडणुकीत उमेदवारी साठी आतूरतेने वाट पाहत असेलल्यांमध्ये आरक्षणामुळे काही जिप गट आणि गणात नाराज झालेची चर्चा आहे. तर अनेकांनी होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या गट आणि गण निवडणूकीच्या रिंगनात आपली निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याचे समजते.
जि प निंभोरा-विवरा गट अनुसूचित जाती (महिला राखीव) असल्याने निंबोल येथील रहिवाशी प्रकाश शामराव तायडे (ग्रामसेवक) यांच्या पत्नी लीला प्रकाश तायडे यांनी
निंभोरा-विवरा गटातून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवित असल्याची चर्चा असून त्यांची दावेदारी चर्चेत आहे.
लीला प्रकाश तायडे यांचे शिक्षण एम.ए.मराठी म्हणजेच पदव्यूत्तर पदवी असे आहे.
हे कुटुंब उच्चशिक्षित व वारकरी संप्रदायातील आहे.
आपले पती प्रकाश तायडे यांचा सामाजिक जनसंपर्क तसेच त्यांची ओळख ही लीला तायडे यांना सकारात्मक ठरणार आहे.





