जामनेर – दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता बोदवड तालुक्यातील सिल्व्हर फाटा परिसरात झालेल्या भीषण अपघातात एक तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मोटरसायकलवरून जात असलेल्या आरिफ शेख याकूब (राहणार – निस्मिल्ला नगर, जामनेर) या तरुणास आयसर वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात आरिफ शेख यांचा जागीच मृत्यू झाला.
मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी बोदवड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केली आहे.
मृताच्या पश्चात वडील, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.





