कुर्नूल – आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे बंगळुरू-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात घडला. एका खासगी प्रवासी बसला आग लागून तब्बल २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला, तर १२ प्रवाशांनी खिडक्या फोडून जीव वाचवला. या दुर्घटनेने परिसरात हाहाकार माजला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कावेरी ट्रॅव्हल्सची खासगी बस हैदराबादहून बंगळुरूकडे जात असताना चिन्ना टेक्कुर गावाजवळ एका दुचाकीला धडकली. त्यानंतर काही सेकंदांतच बसमध्ये प्रचंड स्फोट झाला आणि आग भडकली. क्षणातच संपूर्ण बस आगीच्या विळख्यात सापडली. अनेक प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही.
घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाने तत्काळ धाव घेतली. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवून जखमींना स्थानिक रुग्णालयात हलवलं.
सध्या अनेक प्रवासी गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत.
या भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. स्थानिक पोलिसांनी अपघाताचं कारण आणि मृतांची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू केला आहे.





