मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या दरांमुळे सामान्य लोकांना सोने खरेदी करणे अधिकाधिक कठीण होत चालले आहे. दिवाळीच्या काळात थोडीशी घसरण झाल्यानंतर पुन्हा एकदा सोन्याचे भाव वाढू लागले आहेत. आता २०२६ मध्येही या वाढीचा वेग कायम राहणार असल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत. (Gold Rate Prediction)
तज्ज्ञांच्या मते, २०२५ अखेरपर्यंत सोन्याचे दर स्थिर राहण्याची शक्यता कमी असून, २०२६ मध्येही त्यात वाढच होईल. प्रसिद्ध भविष्यवेत्ती बाबा वेंगा यांच्या भाकितानुसार, जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी येऊ शकते आणि त्यामुळे सोन्याचे दर नव्या उच्चांकावर पोहोचतील. अंदाजानुसार, सोन्याची किंमत प्रति तोळा १ लाख ५० हजारांपेक्षा जास्त जाऊ शकते.
बाबा वेंगाचे भाकीत
बाबा वेंगा यांच्या अनेक भविष्यवाण्या पूर्वीही सत्य ठरल्याचे मानले जाते. त्यांनी आता पुन्हा एकदा २०२६ मध्ये जागतिक बाजारपेठेत मंदी येईल आणि त्यामुळे सोनं अधिक महागेल, असे सांगितले आहे. परिणामी, पुढील वर्षी सोन्याच्या किंमती ऐतिहासिक स्तरावर जाण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांचा अंदाज
बाजार विश्लेषकांच्या मते, सोन्याच्या दरात २५ ते ४० टक्क्यांची वाढ होऊ शकते. त्यामुळे २०२६ मध्ये सोन्याचे भाव १,६२,५०० ते १,८२,००० रुपये प्रति तोळा या दरम्यान राहतील, असा अंदाज आहे. पुढील काही वर्षांत हे दर २ लाख रुपयांचा टप्पा ओलांडतील, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे येत्या काळात सोनं खरेदी करणे सर्वसामान्यांसाठी आणखी आव्हानात्मक ठरणार आहे.





