सहरसा – अमृतसरहून पूर्णिया कोर्टच्या दिशेने जाणाऱ्या जनसेवा एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक १४६१८) मध्ये शुक्रवारी सायंकाळी मोठी दुर्घटना टळली. मोबाईल फोन चार्जिंगदरम्यान फुटल्याने ट्रेनच्या डब्यात आग लागली, आणि काही मिनिटांतच ज्वाळांनी कोच व्यापला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ही घटना शुक्रवारी सायंकाळी सुमारे ६:१० वाजता, सहरसा जिल्ह्यातील सोनबरसा कचहरी रेल्वे स्टेशनजवळ घडली.
प्रवासी रामकुमार यांनी सांगितले की, “चार्जिंगसाठी मोबाईल लावल्यावर तो अचानक फुटला आणि काही क्षणातच आग पसरली. काही मिनिटांतच डब्याभर धूर आणि ज्वाळा दिसू लागल्या.”
आग लागल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ अग्निशमन यंत्रांचा वापर करून आग नियंत्रणात आणली. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे दुसऱ्या कोचमध्ये हलवण्यात आले.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, “आग तातडीने विझवण्यात आली असून कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही.घटनेनंतर सिव्हिल पोलिस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली.
आग विझवल्यानंतर ट्रेनला पुन्हा स्टेशनवरून पुढे पाठवण्यात आले.
रेल्वे विभागाने या घटनेचा सविस्तर तपास सुरू केला असून, मोबाईलचा स्फोट कशामुळे झाला याबाबत चौकशी सुरू आहे.





