यावल – महाराष्ट्र पोलीस दलातील कार्यरत तसेच सेवानिवृत्त पोलिसांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पोलीस बॉईज असोसिएशन, महाराष्ट्र राज्य तर्फे ४ नोव्हेंबर २०२५ रोजी आझाद मैदान, मुंबई येथे एकदिवसीय भव्य आंदोलन आयोजित करण्यात आलं आहे. या आंदोलनाचं नेतृत्व संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद वाघमारे करणार आहेत.
या आंदोलनात मांडण्यात येणाऱ्या प्रमुख मागण्यांमध्ये —
1. पोलिसांच्या पाल्यांना १० टक्के आरक्षण,
2. २०२३ पासून प्रलंबित DG लोनचे तात्काळ वितरण,
3. सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या पत्नींना सर्व आजारांवर मोफत उपचार,
4. पोलिसांची ड्युटी ८ तासांची करणे,
5. पोलिसांच्या पाल्यांसाठी शहीद तुकाराम ओंबाळे महामंडळाची स्थापना,
6. २००५ नंतर भरती झालेल्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे,
7. १०, २०, ३० वर्षांच्या सेवेनुसार लाभाची अंमलबजावणी,
8. रेल्वे पोलिसांसाठी प्रत्येक स्टेशनवर स्वतंत्र चेंजिंग रूमची व्यवस्था,
अशा मागण्यांचा समावेश आहे.
या आंदोलनासाठी जळगाव जिल्हा अध्यक्ष भूषण नगरे, उपाध्यक्ष हेमंत तावडे, जिल्हा संघटक घनश्याम निळे, जिल्हा सचिव योगेश अडकमोल, जिल्हा कार्याध्यक्ष जितेंद्र कोळी, कायदेशीर सल्लागार अॅड. देवकांत पाटील, प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र आढाळे, तसेच यावल तालुका अध्यक्ष किशोर पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांनी सर्व पोलिस बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे.





