रावेर तालुका – येथील न्यू इंग्लिश स्कुल मधील सन २००७ च्या बॅच मध्ये शिक्षण घेणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचे नेहा मेळावा मोठ्या उत्साहात झाला यावेळी सुरुवातीला विद्यार्थ्यांनी सरस्वती मातेचे पूजन करीत कार्यक्रमाला सुरुवात केली. आपले मनोगत व्यक्त करताना अनेकांनी आपल्या बालपणातील स्मृतींना उजाळा दिला. अवखळ बालपणाचे जीवनातील दिवस आठवण करत पहिल्यासारखे वर्ग भरून, संगीत खुर्चीचा ही आनंद लुटला, आपल्या जीवनातील शिक्षकांचे महत्व व मार्गदर्शन सांगितले. उपस्थित गुरुजन सतीश पवार, एस एम.भोगे सर, वसुंधरा नेमाडे, यांचा आदरातिथ्य सत्कार करण्यात आला स्नेहभोजनात भरीत पुरीचा आस्वाद घेतला
याप्रसंगी माजी विद्यार्थी म्हणून भोजराज नेहेते, भूषण बोंडे, राकेश खाचणे, मोरेश्वर जंगम,गुरुदास बऱ्हाटे, पवन चौधरी, आकाश चौधरी,पंकज चौधरी, विजय गिरडे, पंकज भंगाळे,गणेश बोंडे,चेतन नेहेते, प्रवीण भंगाळे , गणेश घुले, अब्दुल पटेल,रफिक खान, जितू कोळी, सरफराज खान,सागर तायडे, राजू सोनार, युवराज राठोड,राजू नाथ,खुशाल कोळंबे, निखिल भोगे, कोमल नेहेते, चेतन भंगाळे, गौरव कोंडे, निखिल नेहेते,निलेश भंगाळे,रेश्मा पाटील,कल्याणी पवार, संगीता नेहेते,माधुरी भारंबे, प्राजक्ता पवार,पूनम गिरडे,अर्चना पाटील,रूपाली पाटील,वर्षा महाजन, कविता शेलोडे, प्रतिभा पाटील,लीना ठाकूर, भाग्यश्री बऱ्हाटे, उज्वला येवले,देवयानी पाटील, यापैकी बहुतेक मित्रमंडळी ही नोकरी निमित्त पुणे, मुंबई,नाशिक, व देशात इतर ठिकाणी स्थायिक झाले आहे मात्र दिवाळीच्या सणात सर्व विद्यार्थी आपल्या गावी सुट्टीत आल्यामुळे बहुसंख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन ऍड.नितेश महाजन यांनी केले.
आभार अ. (इमरान) पटेल यांनी मानले.





