रावेर तालुका – काँग्रेस तर्फे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी संपूर्ण सज्जता दाखवून दिली आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह, एकजूट आणि आत्मविश्वास पक्षात नवचैतन्य संचारले असून, रावेर काँग्रेस पुन्हा एकदा रणांगणात ताकदीने उतरायला तयार झाली आहे.
आज रावेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रावेर तालुका व रावेर शहर काँग्रेस समितींची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीचे मार्गदर्शन व निरीक्षण मा. डॉ. अरविंदजी कोलते (महासचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व प्रभारी – रावेर–यावल मतदारसंघ) यांनी केले. बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांनी विविध जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका मतदारसंघांतील स्थिती, संभाव्य उमेदवार व विजयाच्या शक्यता यावर सविस्तर चर्चा केली.या चर्चेतून एक महत्त्वाचा मुद्दा पुढे आला कि काही स्थानिक नेते काँग्रेसपासून दूर गेले असले तरी मतदार आजही काँग्रेसच्या विचारधारेवर आणि वारसावर ठाम श्रद्धा ठेवून आहेत. कार्यकर्त्यांनी याला पक्षासाठी एक मोठं बलस्थान आणि आगामी निवडणुकांतील प्रभावी अस्त्र म्हणून पाहिलं आहे.
आपल्या मार्गदर्शनात डॉ.अरविंदजी कोलते म्हणाले, “मतदारांचा भावनिक विश्वास हेच काँग्रेसचे खरं सामर्थ्य आहे.आता हा विश्वास विजयात बदलण्याची वेळ आली आहे. मतदारांचे प्रेम आणि निष्ठा हेच आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याचे प्रेरणास्थान असले पाहिजे.”या बैठकीत झालेल्या चर्चांमधून उमटलेला उत्साह, घोषणांचा गजर आणि कार्यकर्त्यांची एकजूट पाहून रावेर तालुका काँग्रेसने विजयाच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले आहे. ही लढाई फक्त निवडणुकीची नाही ती जनतेच्या विश्वासाची,विचारधारेच्या निष्ठेची आणि काँग्रेसच्या पुनरुत्थानाची लढाई आहे.यावेळी मा.डॉ.राजेंद्र पाटील(तालुकाध्यक्ष रावेर काँग्रेस) मा.संजय जमादार(जिल्हाध्यक्ष आदिवासी सेल)मा.धुमा तायडे(शहराध्यक्ष रावेर)मा.देविदास हडपे,मा.हमीद शेठ,मा.हरिष गनवाणी,मा.विनायक महाजन,मा.रामदास लहासे,मा.नरेंद्र पाटील,मा.जिजाबराव महाजन,मा.उस्मान तडवी,मा.गुणवंत टोंगळे,मा.लियाकत जमादार,मा.दिलरुबाब तडवी,मा.योगेश गजरे,मा.संतोष पाटील,मा.सावन मेढे,मा.लक्ष्मण पवार,मा.ललित पाटील,मा.माजित तडवी,मा.युसूफ जमादार,मा.हितेंद्र पाटील,मा.अय्युब मेंबर,मा.गयास शेख,मा.युसूफ येलेकार,मा.मा.मुतलिफ्त मेंबर,मा.भूपेंद्र जाधव,मा.यशवंत महाजन,मा.मुस्तफा तडवी,मा.प्रताप राठोड, मा.काशिनाथ निकम,मा.संजय पवार,मा.युनूस तडवी,मा.प्रमोद वानखेडे,मा.इस्माईल मेंबर,,मा.रतन बारेला,मा.शोयेब शैख,मा.प्रविण भिल व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी व नेते उपस्थित होते..





