रावेर तालुका – रावेर तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथील नवीन काँक्रिटरस्ता बऱ्याच दिवसापासून निधी मिळत नसल्याने ठेकेदाराने थंडबस्त्यात गुंडाळला आहे. पंचक्रोशीतील मुख्य रस्त्ता असल्याकारणाने येथुन पादचारी, अवजड वाहने तसेच शालेय विद्यार्थ्यांची नेहमी वर्दळ असते.अशातच पावसाच्या पाण्यामुळे मोठमोठे खड्डे व चिखल झाल्यामुळे समस्या अधिकच गंभीर झाली आहे. यासंदर्भात संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी. व रेंगाळलेल्या या रस्त्या संदर्भात लोकप्रतिनिधींनी ही लक्ष देऊन लवकरात लवकर काम कर सुरू करण्यासंदर्भात निर्देश द्यावेत. अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे नाहीतर यापुढे मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही ग्रामस्थांकडून देण्यात आलेला आहे.
= प्रतिक्रिया =
विवेक ठाकरे
माजी उपसरपंच निंभोरा
{ निंभोरा येथील रेंगाळलेल्या काँक्रिटीकरणाच्या रस्त्यामुळे वाहनधारकांचे हाल व अपघात होत आहे या संदर्भात सार्वजनिक विभागाने लक्ष घालून या समस्येचे लवकरच निराकरण करावे अन्यथा मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे. }





