रावेर तालुका – खिर्डी ता रावेर येथील रहवाशी शाहरुख मनियार व त्याची आई मुक्ताईनगर येथे जात असतांना त्यांचा वरणगाव फॅक्टरी मार्गावर असलेल्या पवन नगर येथे अपघात झाला या ठिकाणी वेळेवर भाजप चे प्रतिष्ठित नेते तसेच माजी जि प सदस्य नंदकिशोर महाजन अपघात ग्रस्तांची मदत करून त्यांना आपल्या खासगी गाडीत वरणगाव शासकीय रुग्णालय येथे पोहचवत तातडीने उपचार केले त्यांच्या सोबत भाजपा तालुका अध्यक्ष दुर्गेश पाटील यांनी मदत केली. त्यांनी केलेल्या अनमोल सहकार्य बद्दल अपघात ग्रस्तांच्या नातेवाईकांनी त्यांचे आभार कौतुक करून आभार मानले.





