• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, January 16, 2026
Dainik Vyaghra Shuryam Live News
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
Dainik Vyaghra Shuryam Live News
No Result
View All Result

विमानतळावर परदेशी सिगारेट तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस; दोन प्रवाशांना अटक

vyaghra shuryam by vyaghra shuryam
October 29, 2025
in खान्देश, जळगाव, ताज्या बातम्या
0
विमानतळावर परदेशी सिगारेट तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस; दोन प्रवाशांना अटक
बातमी शेअर करा !

नागपूर – हरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहाटे परदेशी सिगारेट तस्करीचा आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रकार उघडकीस आला. एअर अरेबियाच्या शारजाह-नागपूर विमानातून 650 पॅकेट्समध्ये सुमारे दीड लाख सिगारेट आणल्या गेल्या. या मालाची किंमत 12 लाख रुपयांहून अधिक असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणात दोन प्रवाशांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे.
एअर अरेबियाची शारजाह-नागपूर फ्लाइट (जी9-415) रविवारी पहाटे 4:15 वाजता नागपूर विमानतळावर उतरली. प्रवासी बाहेर पडण्यापूर्वी सीमाशुल्क तपासणी दरम्यान दोन प्रवाशांच्या सामानात संशयास्पद वस्तू आढळल्या. पकडले गेलेले प्रवासी मोहम्मद जाकी आणि अब्दुल कादिर जहीर यांच्याजवळ एकूण सात पिशव्या सापडल्या. त्यात 650 पॅकेट्समध्ये सुमारे दीड लाख सिगारेट्स ठेवलेल्या होत्या. तपासाच्या दृष्टीने हा माल कुठे नेण्यात येणार होता हे अद्याप उघड करण्यात आलेले नाही. या सिगारेट्स ‘ईएसएसई स्पेशल गोल्ड’ ब्रँडच्या असल्याचे समजते. सध्या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे असा प्रश्नही उपस्थित होत आहे की, एवढ्या संख्येत सिगारेट्स प्रवाशांनी बॅग आणि हँड बॅगमधून कशा आणल्या?
नागपूर विमानतळावर जप्त करण्यात आलेल्या सिगारेट्स कोरियन ब्रँडच्या असल्याचे समजते. प्रत्येक सिगारेटमध्ये सुमारे 3.5 मिग्रॅ टार, 0.4 ते 0.45 मिग्रॅ निकोटिन आणि 53 ते 55 टक्के तंबाखू असते. या सुपर स्लिम सिगारेट्सचे आकर्षक सुवर्ण पॅकेजिंग असते. सांगितले जाते की, या सिगारेट्सची ऑनलाइन विक्रीही केली जाते. मात्र, कितीही आकर्षक पॅकेजिंग असले तरी शरीरासाठी त्याचे दुष्परिणाम कमी होत नाहीत. तज्ज्ञांच्या मते, या प्रकारच्या सिगारेट्सचे सेवन करणारी व्यक्ती हळूहळू धूम्रपानाची सवय लावून घेते. परदेशी सिगारेट तस्करीमागे जास्त नफा मिळवण्याचा हेतू असतो. ‘ईएसएसई’ व्यतिरिक्त ‘गुडंग गरम’, ‘माँड’, ‘डनहील’ आणि ‘डेवीडॉफ’ या ब्रँड्सचीही तस्करी केली जाते. भारतातील जास्त कर आणि सीमाशुल्क टाळण्यासाठी अशी तस्करी केली जाते. कुरिअर सेवा आणि वैयक्तिक सामानाद्वारेही या सिगारेट्स एअर रूटने देशात आणल्या जातात. तरुणांप्रमाणेच अनेक महिला ग्राहकांमध्येही या सुपर स्लिम सिगारेट्सची मागणी वाढत आहे.

बातमी शेअर करा !
Next Post
महाराष्ट्रात दररोज ६१ बालकांवर अत्याचार; लैंगिक गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले

महाराष्ट्रात दररोज ६१ बालकांवर अत्याचार; लैंगिक गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निमखेडी शिवारात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; परिसरात खळबळ

निमखेडी शिवारात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; परिसरात खळबळ

December 16, 2025
उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु कालेज मध्ये रेबीज आणि ॲनिमिया जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु कालेज मध्ये रेबीज आणि ॲनिमिया जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

December 16, 2025
आईला शिवीगाळ व मारहाणीचा जाब विचारल्याने युवकावर चाकू हल्ला

आईला शिवीगाळ व मारहाणीचा जाब विचारल्याने युवकावर चाकू हल्ला

December 16, 2025
पाल येथे नामदार नूरखा तडवी उर्दू हायस्कूलमध्ये तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

पाल येथे नामदार नूरखा तडवी उर्दू हायस्कूलमध्ये तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

December 16, 2025
Load More
Dainik Vyaghra Shuryam Live News

© 2025 Vyaghra Shuryam Live News

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक

© 2025 Vyaghra Shuryam Live News