अहमदाबाद – लग्नाच्या कार्यक्रमासाठी वेळेत ब्लाउज न शिवल्याने अहमदाबादमधील एका टेलरला तब्बल सात हजार रुपयांचा फटका बसला आहे. नवरंगपुरा येथील एका महिलेनं या टेलरविरुद्ध ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.
ही बाब गांभीर्याने घेत अहमदाबाद ग्राहक विवाद निवारण आयोगाने टेलरला संबंधित ग्राहकाला ₹4,395 आगाऊ रक्कम वार्षिक 7% व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर मानसिक त्रास आणि खटल्याचा खर्च म्हणून अतिरिक्त भरपाई देण्याचाही आदेश आयोगाने दिला आहे.
घटनेनुसार, सी. जी. रोडवरील दुकानात काम करणाऱ्या टेलरला महिलेने ब्लाउज शिवण्यासाठी ₹4,395 आगाऊ दिले होते. परंतु, टेलरने ठरलेल्या वेळेत काम पूर्ण न केल्याने महिलेचा विवाह सोहळ्याचा पोशाख अपुरा राहिला. या निष्काळजीपणामुळे झालेल्या त्रासाबद्दल आयोगाने टेलरविरुद्ध निर्णय दिला.




