पाल, ता. रावेर – सातपुड्याच्या अतिदुर्गम शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वर्ग सुरू सुटण्याच्या वेळेस परिसरात रोडरोमिओंचा त्रास होण्याच्या आणि टवाळखोर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
याची दखल घेत लवकरात लवकर पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी संबंधित शैक्षणिक संस्थांचे मुख्याध्यापक लवकरच पोलिस प्रशासनाकडे करणार आहेत. शाळा व महाविद्यालय परिसरात काही टवाळखोर युवक कर्णकर्कश हॉर्न वाजवत जोरात दुचाकी चालवतात. वर्ग सुटण्याच्या वेळेस मुलींना उद्देशून
शेरेबाजी, छेडछाड, धमकी देणे, रस्त्यावर उभे राहून त्रास देणे, अशा प्रकारांनी विद्यार्थी, विशेषतः विद्यार्थिनी त्रस्त झाल्या आहेत.
पोलिसांनी तातडीने टवाळखोरांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
काही तरुण शाळा-महाविद्यालयासमोर थांबून मुद्दाम अडथळा निर्माण करतात. हटकल्यास वाद घालतात, उलट धमक्या देतात. यामुळे शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण संस्था आणि विद्यार्थी प्रचंड मानसिक तणावात आहेत.
सुरक्षारक्षक असूनही टवाळखोरांची दहशत कायम शाळा-महाविद्यालयांकडून
सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली असली, तरी सुरक्षारक्षकांचा धाक नसल्याने या टवाळखोरांची बिनधास्त वर्तणूक वाढत आहे.




