नवी दिल्ली – महिलांच्या आरोग्य व सक्षमीकरणावर आधारित ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान’ने नुकतेच तीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स प्रस्थापित करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या उपक्रमाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष प्रशंसा व्यक्त केली आहे.
पंतप्रधान मोदींनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, “हे खूप कौतुकास्पद आहे! अशा प्रकारचे सामूहिक अभियान आपल्या महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांना चालना देतात आणि आपल्या नारीशक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतात.”
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानेही या यशाबद्दल समाधान व्यक्त करत म्हटले की, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि महिलांच्या सर्वांगीण कल्याणावर लक्ष केंद्रित करणारे हे अभियान भारताच्या सार्वजनिक आरोग्य प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरले आहे.





