• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, January 15, 2026
Dainik Vyaghra Shuryam Live News
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
Dainik Vyaghra Shuryam Live News
No Result
View All Result

पाचोऱ्यात आमदार किशोर पाटील यांचा भाजपवर घणाघात; “बंडखोरांना शाबासकी, आमदारांना कवडी नाही” असा आरोप

vyaghra shuryam by vyaghra shuryam
November 3, 2025
in खान्देश, जळगाव, ताज्या बातम्या, राजकारण
0
पाचोऱ्यात आमदार किशोर पाटील यांचा भाजपवर घणाघात; “बंडखोरांना शाबासकी, आमदारांना कवडी नाही” असा आरोप
बातमी शेअर करा !

पाचोरा – शिवसेना शिंदे गटाच्या निर्धार मेळाव्यात आमदार किशोर पाटील यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. भाजपकडून बंडखोरांना पुन्हा पक्षात घेण्यात येत असल्याबद्दल त्यांनी टीकास्त्र सोडले.
“महायुतीच्या एका वर्षाच्या काळात आमदारांना एक फुटकी कवडीही मिळाली नाही,” असा टोला लगावत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला.

किशोर पाटील म्हणाले, “शिवसेनेच्या पाचही आमदारांनी ठरवलं, तर जळगाव जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा अध्यक्ष बसवू शकतो. भाजपचे नेते युतीबद्दल बोलतात, पण हे कधी पलटी खातील सांगता येत नाही.”

ते पुढे म्हणाले, “चंद्रपूरच्या सभेत बावनकुळे म्हणाले होते, बंडखोरी केल्यास पाच वर्ष हकालपट्टी होईल. पण माझ्या मतदारसंघात बंडखोरी झाली, तरी कारवाई नाही. उलट त्या बंडखोरांना पद देऊन सन्मानित केले.”


शिंदेंचं कौतुक:

पाटील म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी ‘एक दिवसाचा मुख्यमंत्री’ चित्रपटातील नायकासारखं काम केलं. त्यांनी प्रत्येक भगिनीला दीड हजार रुपयांचं मानधन दिलं — ग्रामीण भागात त्याची किंमत माहिती आहे. शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले असते, तर हे मानधन २१०० रुपये झाले असते. ते न झालं, हे दुर्दैव आहे.”


महायुतीवर प्रहार:

“महायुतीच्या वर्षभरात आमदारांना काहीच मिळालं नाही. आम्हाला फक्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचाच आधार आहे,” असं ते म्हणाले. अतिवृष्टीमुळे मतदारसंघातील विकास ठप्प झाल्याचं सांगत त्यांनी जिल्हा नियोजन निधीतून किमान ५० टक्के निधी आपल्या मतदारसंघाला देण्याची मागणी केली.

“शिंदेंच्या काळात एक रुपयाचा पिकविमा होता; तो सुरू ठेवला असता तर शेतकऱ्यांना शासनाकडे हात पसरवावा लागला नसता,” असं म्हणत त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले.


शेतकऱ्यांसाठी मागणी:

पाटील म्हणाले, “बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसाठी आंदोलन केलं, त्यांचं मी अभिनंदन करतो. मुख्यमंत्री आता ‘३० जूनची तारीख’ देऊ नका — तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमाफी करा.”

बातमी शेअर करा !
Next Post
नगरात नवी विकासकामांची सुरुवात

नगरात नवी विकासकामांची सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निमखेडी शिवारात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; परिसरात खळबळ

निमखेडी शिवारात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; परिसरात खळबळ

December 16, 2025
उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु कालेज मध्ये रेबीज आणि ॲनिमिया जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु कालेज मध्ये रेबीज आणि ॲनिमिया जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

December 16, 2025
आईला शिवीगाळ व मारहाणीचा जाब विचारल्याने युवकावर चाकू हल्ला

आईला शिवीगाळ व मारहाणीचा जाब विचारल्याने युवकावर चाकू हल्ला

December 16, 2025
पाल येथे नामदार नूरखा तडवी उर्दू हायस्कूलमध्ये तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

पाल येथे नामदार नूरखा तडवी उर्दू हायस्कूलमध्ये तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

December 16, 2025
Load More
Dainik Vyaghra Shuryam Live News

© 2025 Vyaghra Shuryam Live News

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक

© 2025 Vyaghra Shuryam Live News